हागणदारीमुक्त योजनेत पुणे विभाग प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गावे योजनेमध्ये यंदा पुणे विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच कोकण विभागाचा दुसरा, तर औरंगाबाद विभागाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

पुणे - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गावे योजनेमध्ये यंदा पुणे विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच कोकण विभागाचा दुसरा, तर औरंगाबाद विभागाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरी 82 टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, 2012 पासून 2017 मार्च अखेर पुणे जिल्ह्यामध्ये 1 लाख 67 हजार 911 शौचालये बांधली असून, 96 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर साताऱ्यामध्ये 1 लाख 3 हजार 814 शौचालये (85 टक्के), सांगलीमध्ये 1 लाख 14 हजार 844 (96 टक्के), कोल्हापूरमध्ये 96 हजार 357 शौचालये (84 टक्के), तर सोलापूरमध्ये 1 लाख 78 हजार 923 शौचालये बांधली असून, 64 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पहिला क्रमांक मिळाल्यामुळे पुणे विभागामधील जिल्ह्यांतील शंभर टक्के हागणदारीमुक्त गावांना केंद्र सरकारकडून "स्वच्छ भारत निधी' दिला जाणार आहे. कोकण विभागाचा दुसरा, तर औरंगाबाद विभागाचा तिसरा क्रमांक आला. त्यानंतर नाशिक, अमरावती, नागपूर विभागांचा क्रमांक आला आहे. 

अजून एक लाख शौचालये बांधणार 
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये एकूण 6 लाख 61 हजार 849 शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. गतवर्षी एकूण 3 लाख 84 हजार 986 शौचालये बांधली होती. आगामी काळात 1 लाख 48 हजार 143 नियोजित शौचालये बांधण्यात येणार आहेत. जिल्हानिहाय नियोजित (शिल्लक) शौचालयांची संख्या : पुणे (6 हजार 824), सातारा (18 हजार 107), सांगली (5 हजार 247), कोल्हापूर (18 हजार 967), तर सर्वाधिक सोलापूर येथे 98 हजार 998 शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. 

Web Title: Pune the first section of the plan hagandari mukta