पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पुणे - पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला. महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड झाली.

आज (बुधवारी) झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत असल्याने दोन्ही पदांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार होती. मुक्ता टिळक यांना 98 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नंदा लोणकर यांना 52 मते मिळाली. लोणकर यांचा 46 मतांनी पराभव झाला. शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेतली होती.

उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नवनाथ कांबळे यांची निवड झाली. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता ही निवडणूक झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 162 पैकी तब्बल 98 जागा मिळाल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे राहतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले होते.

Web Title: Pune to get a new mayor, BJP leader Mukta Tilak