विसर्जन मिरवणुकीपूर्वीच गिरीश बापटांची पोटपूजा (व्हिडिओ)

Pune
Pune

पुणे : ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात होण्यापूर्वीच पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोटपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सर्वपक्षीय नेते भरपोट खात असल्याचे स्पष्ट दिसते.

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि साऊंड सिस्टीमचा वाद सुरू असताना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकाळी-सकाळी पोटपुजा केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जवळील काका हलवाईमध्ये बापट यांनी सर्वपक्षीय राजकिय नेत्यांसोबत अगदी पोटपूजा केली. त्यामुळे बापट यांच्यावर टिकेची झोड उठू लागली आहे.

पुण्यात प्रथेप्रमाणे पालकमंत्री व महापौर यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची पुजा होऊन मिरवणुकीला सुरवात होते. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com