महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू

tejaswini-bus
tejaswini-bus

हडपसर- शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून आता सुटका होणार आहे. यासाठी पीएमपीएलने खास महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू केली. त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला. गाडीतळ ते वारजे या मार्गावर रोज चार तेजस्विनी बस धावणार आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. या बसमधून २२ महिला प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 

सुरक्षिततेच्या दृष्टीने या बसमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे, जीपीआरएस, अल्हाददायक सिटची रचना या बसमध्ये उपल्बध आहेत. या बसेससाठी महिला कंडक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना या सेवेमुळे सुरिक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.

या बसच्या उदघाटनप्रसंगी डेप्युटी आरटीओ विनोद सगरे, वित्तविभाग प्रमुख विनोद होले, गाडीतळ डेपो व्यवस्थापक कैलास गावडे उपस्थित होते. याऴेळी बोलताना 
गावडे म्हणाले महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिलांची स्वतंत्र बसची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे त्यांना रांगेत तातकळत उभे राहू लागू नये, बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी तेजस्विनी बसेसची भूमीका महत्वाची राहणार आहे.

महिला प्रवासी योगीता भापकर म्हणाल्या, नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. कित्येकदा रांगेत तातकळत उभे रहावे लागते. तसेच बसमध्ये अनेकदा जागा मिळत नाही. त्यामुळे महिलांना या बससेवाचा चांगलाच फायदा होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com