लोणावळा लोकलच्या चार, डेमूच्या दोन फेऱ्या रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

पुणे : लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे 23 ते 30 एप्रिल या काळात पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोकलच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे-दौंड दरम्यानच्या डेमू पॅसेंजरच्याही रोजच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

पुण्यावरून लोणावळ्याला जाणारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांची आणि दुपारी 1 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच लोणावळ्याहून पुण्याकडे येणारी दुपारी दोन आणि साडेतीन वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पुणे-दौंड दरम्यान लोहमार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे या मार्गावरील गाड्यांतही बदल करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजता निघणारी पुणे-दौंड डेमू पॅसेंजर (गाडी क्र. 71407) आणि दौंडवरून दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी पुण्याकडे येणारी डेमू (क्र. 71408) रद्द करण्यात आली आहे. 

बारामती-पुणे पॅसेंजर (गाडी क्र. 51452) आणि पुणे-निजामाबाद पॅसेंजर (गाडी क्र. 51421), पुणे-दौंड-पुणे स्थानकादरम्यान रद्द करण्यात आली आहे. 

अमरावती-पुणे एक्‍स्प्रेस (गाडी क्र. 11406) मंगळवारी दौंड स्थानकावर सुमारे 50 मिनिटे आणि रविवारी सुमारे 1 तास 50 मिनिटे थांबेल. हैदराबाद-पुणे एक्‍स्प्रेस (गाडी क्र. 17014) सोमवार, बुधवार आणि शनिवारी दौंड स्थानकावर सुमारे दीड तास थांबविण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Pune Lonavala Local will not be running during 23 to 30 April