पंढरपूर संस्थान समिती बरखास्तीचा निर्णय कार्तिकीपूर्वी

विलास काटे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन, मुंबईत दहा आक्टोंबर रोजी होणारे वारकऱयांचे आंदोलन स्थगित

आळंदी : श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान समितीच्या बरखास्तीबाबत सरकार कार्तीकी एकादशीपूर्वी सकारात्मक आणि समाधानकारक निर्णय घेईल असे आश्वासन राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारकरी प्रतिनिधींना आज पुण्यात दिले. या निर्णयाची माहिती सहकारमंत्री श्री.पाटील आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींनी एकत्रीत जाहीर केली. सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे दहा आक्टोबर रोजीचे मुंबईतील आझाद मैदानावरिल वारक-यांचे नियोजित भजनी आंदोलन कार्तिकी एकादशीपर्यंत स्थगित करण्यात आले. 

पंढरपूर मधिल श्री विठ्ठल रूक्मीणी देवस्थान समिती बरखास्त करून त्यावर वारक-यांची नियुक्ती व्हावी या मागणीसाठी आषाढी वारीपासून आंदोलनाचे नियोजन केले होते. राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानावर दहा आक्टोबरला जमणार होते. राज्यभरातून वारक-यांच्या जिल्हावार बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र तत्पूर्वी आज सरकारच्या वतीने वारक-यांची भूमिका ऐकून घेण्यासाठी सहकारमंत्री श्री. पाटील यांनी पुण्यातील शासकिय विश्रामगृहात दुपारी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी वारकरी प्रतिनिधींनी पाटील यांच्यासमोर सांप्रदायाची भूमिका मांडली. तसेच अपेक्षित मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी बंडातात्या कराडकर, राजाभाउ चोपदार, अॅड माधवी निगडे, रामभाउ चोपदार, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, रविंद्र पाटील, रामेश्वर शास्त्री, संजयनाना धोंडगे, उर्जितसिंह शितोळे सरकार, बाळासाहेब आरफळकर, डॉ. अभय टिळक, चैतन्य लोंढे, नरहरी चौधरी, नंदलाल लाहोटी, संजय घुंडरे यांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :