आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत धेंडे यांचे निधन 

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गणपत धेंडे यांचे शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.  उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे ते वडील होत. 
अनेक दिवसांपासुन ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यासाठीचे उपचार त्यांच्यावर सुरु होते. एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

सासवड येथील पारगाव मेमाणे हे धेंडे यांचे मुळ गाव. 1954 मध्ये नोकरीनिमित्त ते पुण्यात आले.  रेल्वे प्रशासनात पोलिस म्हणुन ते 2 वर्ष नोकरीस होते. त्यानंतर खडकी येथील दारुगोळा कारखान्यात काम करण्यासाठी रुजू झाले. येथील उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले. सासवड, येरवडा व नागपुर चाळ परीसरामध्ये त्यांनी आंबेडकर चळवळ रुजविण्यासाठी आणि 1956 च्या धर्मांतर चळवळीमध्ये मोठे योगदान दिले.

दुपारी 12 वाजता येरवडा येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :