संजय राऊत यांच्या वक्तव्यात तथ्य नाही- सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. त्या माझ्या मंत्रिमंडळात असणे मला आवडेल असेही विधान मोदींनी केल्याचे खुद्द शरद पवार यांनीच आपल्याला सांगितले, असे संजय राऊत यांनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. 

बारामती : खासदार संजय राऊत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल केलेल्या वक्तव्यात काहीही अर्थ नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही, असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवार) येथे केला. 

'सकाळ'शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, 'या संदर्भात कसलीही चर्चा झालेली नाही. शरद पवार, मी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये या विषयाबाबत स्वतंत्र चर्चाच कधी झालेली नाही, त्यामुळे संजय राऊत यांनी अचानकच हे विधान कसे केले, याचे मलाही आश्चर्य वाटते.'

सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. त्या माझ्या मंत्रिमंडळात असणे मला आवडेल असेही विधान मोदींनी केल्याचे खुद्द शरद पवार यांनीच आपल्याला सांगितले, असे संजय राऊत यांनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र राऊत यांच्या विधानात कसलेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, भाजपसोबत जाण्याचा किंवा मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा कसलाही प्रश्नच उदभवत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केले.

याबाबत आपण निवेदनही केलेले असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्या म्हणाल्या. हा विषय अचानकच कोठून समोर आला आणि संजय राऊत यांनी माझ्या बाबत असे कसे नमूद केले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या विषयाबाबत मोदी यांनी पवार यांना कधीही काहीही सांगितलेले नव्हते आणि त्या वेळेस मी तेथे उपस्थित देखील नव्हते, असेही त्या म्हणाल्या. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण