पोलिसांच्या वेशात येऊन दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे : पोलिसांच्या वेशात येऊन दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या यनिट एकच्या पथकाने अटक केली. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाजवळ टाकलेल्या या दरोड्यात आरोपींनी लुबाडलेल्या रकमेपैकी 21 लाखांची रोकड, दोन एअरगन आणि स्कॉर्पिओ जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी दिली. 

शिवाजीनगर मुख्यालयाजवळ गेल्या 24 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी मनोज ऊर्फ कांतीलाल धनाजीभाई डेंडोरे (वय 38, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सूरज कनुभाई राटोड उर्फ हालपट्टी (वय 34, रा. दीव दमन) आणि कमलेश बाबूभाई धोडी (वय 26, रा. धोडीपाडा, जि. वलसाड, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, अनिल उर्फ मामा रामचंद्र आढाव (वय 42, रा. दीव-दमन), पप्पू यादव उर्फ बिहारी, नरेश नट्टू गामित (वय 38, पिथादरा डोलवन, ता. व्यारा, जि. तापी, गुजरात) यांच्यासह अन्य तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :