मांजरी-मुंढवा रस्त्यावर शाॅर्ट सर्कीट : 3 दुकानांना आग

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

सुमारे १५ गॅस सिलेंडर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यांचा एकामागे एक असे जोरदार स्फोट झाले.

मांजरी : येथील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील झेड काॅर्नर जवळील ग्रीनवूड सोसायटीमध्ये असलेल्या तीन दुकानांना शाॅर्ट सर्कीटमुळे आग लागली. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोनजण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

येथे असलेल्या एका भांड्याच्या दुकानात शाॅर्ट सर्कीटमुळे आग लागली. त्यामध्ये सुमारे १५ गॅस सिलेंडर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यांचा एकामागे एक असे जोरदार स्फोट झाले. त्यामुळे शेजारील इतर दोन दुकानांनाही आग लागली.

नीलेश घुले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सुरवातीला पाण्याचे टँकरद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

टॅग्स