सिंहगडावर प्रवासी गाड्यांना प्रवेश, खासगी गाड्यांना बंदी

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जीप चालक व सुरक्षा रक्षक स्थानिक असल्याने स्थानिक लोकांच्या गाड्या सोडल्या जात आहे. असा आरोप काही पर्यटकांनी केला.

खडकवासला : सिंहगडावर दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक बंद आहे. तरी देखील स्थानिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीप सोडल्या गडावर जात आहेत. परंतु पर्यटकांची वाहने सोडली जात नाही. या कारणावरून पर्यटकांनी शनिवारी उपद्रव शुल्क नाक्यावर गोंधळ घातला. 

दरवर्षी दिवाळीत गडावर मोठी गर्दी होत असते यंदा देखील सुट्टी असल्याने पर्यटकांनी आज गडावर जाण्यासाठी गर्दी केली होती. परंतु पर्यटकांची वाहने अडवून धरली जात होती. स्थानिक दुचाकी, जीप गाड्या सोडल्या जात आहेत. मग आम्हाला का अडवून धरता आमच्या गाड्या पण सोडा. अशी पर्यटक मागणी करीत होते. यावेळी वन संरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला.

तसेच, जीप चालक व सुरक्षा रक्षक स्थानिक असल्याने स्थानिक लोकांच्या गाड्या सोडल्या जात आहे. असा आरोप काही पर्यटकांनी केला. आम्ही तुमचे उपद्रव शुल्क भरून आम्हाला का जाऊन दिले जात नाही. असे पर्यटक सांगत होते. याबाबत या ठिकाणी एक ही वन विभागाचा अधिकृत अधिकारी कर्मचारी नाही. हा सगळा कारभार सुरक्षा रक्षकांच्या जिवावर आहे.