आंबळे येथे तरुणाचा खून; मारेकरी पसार

रामदास वाडेकर
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

अंधाराचा फायदा घेत मारेकरी पसार झाल्याची चर्चा गावात होती.

टाकवे बुद्रुक : आंबळे येथे धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली. नवनाथ खंडू येवले (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे.

आंबळे गावाजवळ येवले याचा गोठा, पोल्ट्री फार्म व शेती असून, येथेच ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत मारेकरी पसार झाल्याची चर्चा गावात होती. त्याच मार्गाने जाणाऱ्या दोन तरुणांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या येवलेला पाहून गावात धाव घेतली.

दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्याची मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील सरकारी रूग्णालयात दाखल केला. येवले यांच्या पाश्चात्य आई, वडील, पत्नी, तीन मुले, असा भरघोस परिवार आहे.