पुण्याच्या महापौरांचा बसने प्रवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

टिळक यांची महापौरपदी बुधवारी निवड झाल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी कामाला सुरवात केली. पीएमपीने प्रवास करून त्यांनी प्रवाशांना असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.

पुणे - पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी आज (गुरुवार) पीएमपीच्या बसने प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

टिळक यांची महापौरपदी बुधवारी निवड झाल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी कामाला सुरवात केली. पीएमपीने प्रवास करून त्यांनी प्रवाशांना असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनीही त्यांच्यासमोर दररोज येत असलेल्या समस्या मांडल्या. टिळक यांच्यासोबत दैनिक सकाळचे प्रतिनिधीही होते.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि कचऱ्यावर प्रभावी उपाय या दोन बाबींना आपण प्राधान्य देणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी सकाळला भेट दिल्यानंतर सांगितले होते. महापौरपदी निवड झाल्यानंतर "सकाळ'ला दिलेल्या भेटीत या समस्यांवर आपली मते मांडत त्यांनी "सकाळ'ने स्थापन केलेल्या "पुणे वाहतूक मंच'च्या माध्यमातून समोर येणाऱ्या योजनांचा; तसेच सूचनांचा आपण निश्‍चितच पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.