महावितरणकडे जमा झाले 108 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे ः पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा देऊन ग्राहकांनी भरलेल्या वीजबिलापोटी महावितरणच्या पुणे परिमंडलाकडे सुमारे 108 कोटी 12 लाख रुपये एवढी रोकड जमा झाली आहे. दहा ते 23 नोव्हेंबर या कालावधीत परिमंडलातील 501 वीजबिल भरणा केंद्रांवर जुन्या नोटा देऊन बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.

पुणे परिमंडलातील ग्रामीण व शहरी भागांतील वीजबिल भरणा केंद्रे 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यानही सुरू राहतील, असे महावितरणने कळविले आहे. घरबसल्या ऑनलाइन बिल भरण्याकरिता www.mahadiscom.in हे संकेतस्थळ व मोबाईल ऍपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे राबविण्यात येत असून, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी नवप्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे, असेही महावितरणने स्पष्ट केले.

पुणे

पुणे : भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असेल आणि याचे पुरावे असतील तर, खरं काय ते लोकांसमोर यायला...

04.24 PM

पिंपरी : औद्योगिक क्‍लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री...

04.00 PM

जुन्नर : जुन्नर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष आज (बुधवार) कार्यालयीन वेळेत बंद असल्याने विविध गावातून येथे कामासाठी आलेल्या...

03.21 PM