कारमध्ये सुरक्षापट्टी घुसून चार जण जखमी

Pune Mumbai express highway accident
Pune Mumbai express highway accident

पिंपरी चिंचवड - पुणे मुंबई महामार्गवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. महामार्गाच्या बाहेरील बाजूने वाहनांनी मध्येच अवैध प्रवेश करु नये यासाठी रस्त्याच्या बाजूने सुरक्षा पट्टी लावण्यात आलेली आहे. या सुरक्षा पट्टीलाच धडकून  आज पहाटे सोमाटणे फाटा येथील पुलाजवळ कारला अपघात झाला. 

पुण्याहून मुंबईला जाताना सोमाटणे फाटा पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या कडेला असलेली स्टीलची पट्टी गाडीच्या आरपार गेली.  या भीषण अपघात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमोल शिवाजी पाटील (वय 39) श्रीमंत कृष्णा भोंदे (वय 45) आणि प्रकाश गोविंद वाईगडे (वय 45), सर्व रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर हे गंभीर जखमी झाले आहेत तर सूर्याजी कृष्णा भोंदे चालक, (वय 39), रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर यांना किरकोळ जखम झाली आहे. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com