कार्ल्याजवळ भीषण अपघातात सात ठार

lonavala-accident
lonavala-accident

लोणावळा - पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यानजीक कार्ला येथे दोन मोटारींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांसह सात जणांचा जागीच मृत्यू, तर तीन जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (ता.१५) दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला.

मृतांमध्ये जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय ८२), राजीव जगन्नाथ बहिरट (वय ५२), सोनाली राजीव बहिरट (वय ४६), जान्हवी राजीव बहिरट (वय २० सर्व रा. कलाशंकरनगर, मुंढवा, पुणे) यांच्यासह संजीव मोहनसिंह कुशवाह (वय १७), कृष्णा रमेश शिरसाट (वय २२), निखिल बालाजी सरोदे (वय २०, सर्व रा. अमरदीप सोसायटी, श्रीनगर, रहाटणी, पुणे) यांचा समावेश आहे. तर प्रतीक बालाजी सरोदे (वय १८), आकाश मदने (वय १७), रोहित कड (वय १६) अशी जखमींची नावे आहेत. त्यापैकी प्रतीक सरोदे आणि आकाश मदने यांची प्रकृती गंभीर आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील सहा जण स्विफ्ट मोटारीतून लोणावळ्याकडे जात होते. कार्ला फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध बाजूने पुण्याच्या दिशेने येत असलेल्या सॅंट्रो मोटारीवर समोरासमोर जोरात आदळली. यामध्ये सॅंट्रो मोटारीतील बहिरट कुटुंबातील चौंघाचा, तर स्विफ्ट मोटारीतील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तीन मुले जखमी आहेत. त्यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातात दोन्ही मोटारींचा चक्काचूर झाला. लोणावळा पोलिस, आयआरबी कंपनीची यंत्रणा; तसेच स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. दोन्ही मोटारी कापून मृतदेह बाहेर काढले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे महामार्ग निसरडा झाला असून, भरधाव वेगात लोणावळ्याकडे मौजमजा करण्यासाठी निघालेल्या युवकांच्या मोटारीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तवली. 

बहिरट कुटुंबाचे अखेरचे ‘गेट टुगेदर’ 
सॅंट्रो मोटारीमधील बहिरट कुटुंबीय रविवार असल्याने फॅमिली गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी दोन मोटारींतून लोणावळ्याला आले. कार्यक्रम उरकून परतत असतानाच कार्ला फाट्याजवळ काळाने घाला घातला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com