पुणे पोलिसांच्या सुचनेनंतर महापालिकेकडून शहरातील अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सुचना, महापालिकेच्या मोजणीमध्ये 1400 हून अधिक अनधिकृत फ्लेक्‍स
Pune Municipal Corporation action against unauthorized flexes in city Pune Police order shiv sena maharashtra politics
Pune Municipal Corporation action against unauthorized flexes in city Pune Police order shiv sena maharashtra politics sakal

पुणे : शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार तणावात असून शुक्रवारपासून पुण्यासह विविध ठिकाणी बंडखोर आमदारांचे फ्लेक्‍स, होर्डींग फाडण्यापासून त्यांची कार्यालये फोडण्याचे प्रकार सुरु झाले. दरम्यान, बेकायदा फ्लेक्‍स, होर्डींग हटविण्याच्या प्रकारातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सुचनेनुसार पुणे पोलिसांच्या मदतीने महापालिकेकडून शहरातील राजकीय व अन्य सर्व प्रकारचे अनधिकृत बॅनर, फ्लेक्‍स, होर्डींग हटविण्यास सुरुवात झाली. महापालिकेने मोजणी केल्यानंतर त्यामध्ये 1400 अनधिकृत फ्लेक्‍स असल्याचे आढळून आले असून ते शनिवारी दिवसभरात हटविले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासमवेत घेऊन बंड पुकारल्यानंतर महाआघाडी सरकार मागील काही दिवसांपासून तणावामध्ये आहे. या सगळ्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार तानाजी सावंत यांच्या आंबेगाव बुद्रुक येथील कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेची गांभीर्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी तत्काळ शनिवारी शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींग काढण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेकडून शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींगची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये 1400 हून अधिक फ्लेक्‍स आढळले. त्यानुसार, संबंधित फ्लेक्‍स तत्काळ काढून टाकण्यास महापालिकेने सुरुवातही केली.

दरम्यान, राजकीय व्यक्तींचे फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींग फाडणे, काढण्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने हि कारवाई केली जात असल्याची सद्यस्थिती आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडूनही राजकीय व अन्य सगळ्या स्वरुपाचे फ्लेक्‍स काढले जात आहे. दरम्यान, पोलिसांच्या सुचनेनुसार महापालिकेच्या मदतीने अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींग काढले जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात कोणत्याही स्वरुपाचे अनधिकृत फ्लेक्‍, बॅनर, होर्डींग आढळून आल्यास तत्काळ पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला (क्रमांक - 112) माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com