पुणे : महात्मा फुले वाड्यावर थेट नगरसेविकेच्या सासूचे नाव

संकल्पनेच्या नावाखाली नगरसेवकांनी चमकोगिरी सुरू केलेली असताना आता तर थेट कहरच केला आहे.
Mahatma Phule Wada
Mahatma Phule WadaSakal
Summary

संकल्पनेच्या नावाखाली नगरसेवकांनी चमकोगिरी सुरू केलेली असताना आता तर थेट कहरच केला आहे.

पुणे - संकल्पनेच्या नावाखाली नगरसेवकांनी चमकोगिरी सुरू केलेली असताना आता तर थेट कहरच केला आहे. ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर भाजपच्या माजी नगरसेविकाच्या सासूच्या नावाचा फलक लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेतील नगरसेकांची मुदत उलटल्यानंतर २४ मे रोजी हा फलक लावला असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. मात्र या प्रकाराबाबत प्रशासन आंधारात आहे.

पुणे शहरात प्रत्येक चौकात, गल्लीत, रस्त्यावर नगरसेवकांनी आय लव्ह पुणे, आय लव्ह स्वारगेट यासह मंदिर, मावळे, हमाल यासह विविध प्रकारचे शिल्प, पुतळे उभारले आहेत. पादचारी मार्ग, रस्ते आडवून स्मारक तयार केले आहेत. चौकांचे सुशोभिकरण केले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या आक्षरात संकल्पना म्हणून संबंधित नगरसेवकांचे बोर्ड लावण्यात आले आहेत. या चमकोगिरीसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत. या चमकोगिरी विरोधात ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता.

१४ मार्च रोजी पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपली आहे, त्यानंतरही स्वतःच्या नावाने बोर्ड लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातच २४ मे रोजी आता ऐतिहासीक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हिरहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव आहे. तर संकल्पना म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव आहे. त्याखाली विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे व अजय खेडेकर या चार माजी नगरसेवकांची नावे आहेत. नगरसेविकेच्या सासूचे नाव फुले वाड्यावर लावण्यात आल्याने त्यावर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात आज (ता.२७) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.

‘या कमानीच्या सुभोभिकरणासाठी महापौर निधी दिला आहे, पण त्याठिकाणी संकल्पना म्हणून माझे मी लावलेले नाही व तसे सांगितलेलेही नव्हते. स्थानिक नगरसेवकांनी हे नाव लावले असावे.’

- मुरलीधर मोहोळ, माजी महापौर

‘महात्मा फुले वाडा येथे लक्ष्मीबाई हरिहर यांच्या नावाचा फलक लावण्याची काहीच गरज नाही, हा संतापजनक प्रकार आहे. नगरसेवकांनी मुदत उलटून गेल्यानंतर २४ मे रोजी या ऐतिहासिक वाड्यावर बोर्ड लावला आहे. हा एक प्रकारचा विद्रूपीकरण व महात्मा फुले यांचा अपमान आहे. हा फलक व नावे त्वरीत काढून टाकावीत अन्यथा आंदोलन केले जाईल.’

- मधुकर राऊत, अध्यक्ष, महात्मा फुले मंडळ

‘महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माझ्या आईच्या नावाने फलक लावण्याचा निर्णय महापालिकेच्या नाव समितीमध्ये हा विषय आम्ही मंजूर करून घेतला आहे. यात आमचा कौटूंबीक सहभाग आहे. यास कोणाचा विरोध असेल तर फलक काढण्याबाबत पुढचे पुढे बघू.’

- मोतीलाल हरिहर, नगरसेविकेचे पती

‘महात्मा फुले वाड्याला लावलेल्या फलकाला मान्यता आहे का? ते माहिती नाही, याबाबत माहिती घेऊन सांगितले जाईल.’

- गणेश सोनूने, सहाय्यक आयुक्त, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com