बलात्कारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्‍तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड ठोठावला. ऍन्थोनी अँड्य्रूस जॉन (वय 32, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने आरोपी आणि त्याच्या आईविरुद्ध फिर्याद दिली होती. ऑक्‍टोबर 2014 ते 21 जानेवारी 2015 या कालावधीत हा गुन्हा घडला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी 6 जणांची साक्ष नोंदविली. पीडित मुलीने दिलेली साक्ष आणि त्याला पूरक वैद्यकीय पुरावा आरोप सिद्ध करण्यास महत्त्वाचा ठरला. पोलिस हवालदार पी. पी. पवार आणि पोपट घुले यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

आरोपीच्या आईने पीडित मुलीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून दत्तक घेतले होते. तिला हडपसर येथे घरी आणल्यानंतर आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकाराची माहिती तिने आरोपीच्या आईला दिल्यानंतर तिने तू खोटे बोलत आहेस, असा आरोप करीत मारहाण केली होती.

Web Title: pune news 10 years punishment in rape case