"दगडूशेठ'ला 125 किलोच्या माव्याच्या मोदकाचा नैवेद्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणपतीला 125 किलोच्या माव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. "काका हलवाई'चे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे यांनी अवघ्या सहा तासात हा मोदक साकारला आहे. 

यंदाचा देखावा असलेल्या ब्रह्मणस्पती मंदिरात 125 किलो मोदकासह तब्बल 300 किलो मिठाई व नमकीन पदार्थांचा नैवेद्य शनिवारी (ता. 2) भाविकांना पाहता येणार आहे. माव्याच्या मोदकावर काजू, बेदाणे, बदामांची कलाकुसर केली आहे. त्यामुळे बुधवार पेठेतील "काका हलवाई'मध्ये भाविकांनी हा मोदक पाहण्यासाठी गर्दी केली होती.