‘ए-प्लस’साठी २०० रुपये भाडे

‘ए-प्लस’साठी २०० रुपये भाडे

पुणे - तुळशीबाग, हाँगकाँग लेन, लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता आदी शहराचा मध्यभाग आणि लगतचा भाग ‘ए-प्लस’  असून येथील स्टॉल, पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांचे भाडे दररोज २०० रुपये होणार आहे. याबाबतचा ठराव १८ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 
ठेवण्यात येणार आहे. तो मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी होईल. तत्पूर्वी तीन महिन्यांचे भाडे महापालिकेकडे आगाऊ जमा करावे लागणार आहे.

भागानुसार ठरणार भाडेदर
फेरीवाला पुनर्वसन धोरणांतर्गत स्टॉल, पथारी, फेरीवाले यांच्यासाठी दैनंदिन भाडे आकारणीचा ठराव यापूर्वीच मंजूर झाला आहे. आता ज्या भागात ते व्यवसाय करतील, त्यानुसार त्यांच्याकडून भाडे आकारणी होणार आहे. त्यासाठी ‘ए- प्लस’साठी २०० रुपये, ए- १०० रुपये, बी- ५० रुपये आणि सी- २५ रुपये, असे वर्गीकरण करण्यात आले आहे. 

३३० ठिकाणांवरील दर दैनंदिन
शहराच्या ज्या भागात वर्दळ आहे, व्यापारी भाग आहे, तेथे साधारणपणे जादा भाडे आहे. तसेच, रस्त्यांची रुंदी आणि निवासी लोकसंख्येची घनता, हा मुद्दाही त्यासाठी प्रशासनाने लक्षात घेतला आहे. शहरातील ३३० ठिकाणांवरील स्टॉल, पथारीवाले आणि हातगाडी व्यावसायिकांकडून आता दैनंदिन शुल्क आकारणी होणार आहे. तीन महिन्यांचे आगाऊ शुल्क संबंधित व्यावसायिकाने महापालिकेकडे जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्याचा परवाना रद्द होणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले.

वर्षाला ६० कोटी उत्पन्न अपेक्षित
‘ए- प्लस’ भाग असेल, तर त्या ठिकाणी स्टॉल, हातगाडी आणि पथारीसाठी सारखेच म्हणजे २०० रुपये दैनंदिन भाडे असेल. शहराच्या त्या-त्या भागाच्या ठरविलेल्या झोननुसार भाडे आकारणी होणार आहे. त्या-त्या भागाची भाडे आकारणी संबंधित प्रभाग समित्यांच्या बैठकीत निश्‍चित झाली आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. स्टॉल, पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांकडून नव्या शुल्कानुसार महापालिकेला वर्षाला सुमारे ६० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. 

शहराचा ‘ए प्लस’ भाग
घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय - हाँगकाँग लेन, डेक्कन जिमखाना, कुलकर्णी पथ, हॉटेल सुरभी गल्ली, झेड ब्रिजखालील टपऱ्या. 
विश्रामबागवाडा कार्यालय - शिवाजी रस्ता, श्रीनाथ टॉकीज, मिनर्व्हा टॉकीज, हिराबाग चौक, टिळक रस्ता, तुळशीबाग, महाराष्ट्र बॅंक परिसर, शनिपार, लक्ष्मी रस्ता, शनिवारवाडा, अप्पा बळवंत चौक, फरासखाना. 
भवानी पेठ कार्यालय - अपोलो टॉकीज कॉर्नर. 
सहकारनगर कार्यालय - सिटी प्राइड चित्रपटगृहाजवळ, सारसबाग, आदिनाथ सोसायटीजवळ. 
टिळक रस्ता कार्यालय - संपूर्ण सिंहगड रस्ता. 
कोंढवा- धनकवडी कार्यालय - साळुंके विहार रस्त्यावरील फक्त स्टॉल. 
धनकवडी कार्यालय - कात्रज उद्यानाजवळील १८ स्टॉल. 
बिबवेवाडी कार्यालय - मीरा सोसायटी, कुमार पॅसिफिक मॉलजवळ, सॅलिसबरी पार्क, बिबवेवाडी हुतात्मा बाबू गेनू शाळेजवळ, नेहरू रस्ता, ईएसआय हॉस्पिटल, रम्यनगरीसमोर, लुल्लानगर चौक.

विभागांची निश्‍चिती
शहरातील उर्वरित भागांत स्टॉल व्यावसायिक, पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांकडून १०० रुपये, ५० आणि २५ रुपये दररोज या दराने आता महापालिका भाडे वसूल करणार, त्यानुसार विभागांची निश्‍चिती झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com