५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे - महावितरणने पुणे परिमंडलांतर्गत थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत गेल्या पाच दिवसांत ५२ हजार २६२ ग्राहकांचा वीजपुरवठा ३२ कोटी २३ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित केला आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्‍यात ही कारवाई सुरू आहे.

वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यापैकी २० हजार ५९९ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. महावितरणच्या शहरातील सात विभागांतर्गत आतापर्यंत ४३ हजार ४२४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा २१ कोटी ६० लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित केला आहे. यातील १९ हजार १७३ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. 

भोसरी व पिंपरी विभागांतर्गत पिंपरी व चिंचवड शहरात १८१८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा दोन कोटी ७९ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित केला आहे. तर यातील २०१ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्‍यात ७०२० ग्राहकांचा वीजपुरवठा सात कोटी ८४ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित केला आहे. यात १२२५ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com