आधार केंद्रांच्या प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे - नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुणे शहरातील आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने पत्रकाद्वारे ‘यूआयडी’चे संजय चहांदे यांच्याकडे केली आहे. 

पुणे - नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुणे शहरातील आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने पत्रकाद्वारे ‘यूआयडी’चे संजय चहांदे यांच्याकडे केली आहे. 

केंद्र व राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपासून विविध सरकारी योजना तसेच अनेक अन्य गोष्टींसाठी आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक नागरिकांना आधार कार्ड नोंदणीची किंवा त्यातील दुरुस्तीची पुरेशी सोयच उपलब्ध होत नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात किमान अडीचशे ते तीनशे केंद्रे सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. तिथे मात्र केवळ पंचवीस ते तीस ठिकाणीसुद्धा ही केंद्रे सुरू आहेत. यामुळे नागरिकांना सहा महिन्यांपुढील अपॉइंटमेंट दिल्या जात आहेत. पोस्ट ऑफिस, टेलिफोन खाते अशा अनेक ठिकाणी आधार केंद्रे सुरू करण्याच्या अनेक घोषणा गेल्या महिन्यात झाल्या. परंतु, त्या आजही कागदावरच राहिल्या आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयांच्या आवारात आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम करण्याची तयारी दर्शविलेल्या एजन्सीची पडताळणी करून १८० जणांची यादी आपल्या स्थित कार्यालयाकडे पाठविली आहे. त्यास एक महिना होऊन गेला, मात्र लालफितीच्या धोरणामुळे अद्याप त्यास मंजुरी मिळाली नाही. आधार केंद्रांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज लक्षात घेता आपण कोणताही कालापव्यय न करता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या आधार नोंदणी केंद्राच्या यादीला विनाविलंब संमती द्यावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पत्रकात केली आहे.

Web Title: pune news aadhar card