आधार नोंदणीतील घोळ संपेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

'सर्कलमध्ये एकच मशिन'चे सरकारचे आदेश
पुणे - आधार नोंदणीतील घोळ काही संपेना. एका सर्कलमधील एकच मशिन सुरू करावे, अशा सूचना राज्य सरकारने नव्याने दिल्या आहेत. त्यामुळे आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी गर्दी उसळली असताना सरकारच्या या आदेशामुळे केंद्रांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. परिणामी नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहेत.

'सर्कलमध्ये एकच मशिन'चे सरकारचे आदेश
पुणे - आधार नोंदणीतील घोळ काही संपेना. एका सर्कलमधील एकच मशिन सुरू करावे, अशा सूचना राज्य सरकारने नव्याने दिल्या आहेत. त्यामुळे आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी गर्दी उसळली असताना सरकारच्या या आदेशामुळे केंद्रांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. परिणामी नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहेत.

शासकीय कार्यालयात आधार नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. तसेच खासगी एजन्सीचालकांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास त्यांना सरकारी कार्यालयांच्या आवारात आधार नोंदणीचे काम देऊ, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शहरातील जवळपास शंभरहून अधिक एजन्सीचालकांनी राज्य सरकारच्या या सूचनेनुसार आधार नोंदणीचे काम सुरू ठेवण्याची तयारी दर्शविली.

त्यानुसार महा ई सेवा केंद्राकडून त्यांना मशिनही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही एजन्सीचालकांचे मशिन ऍक्‍टिव्हेट करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर राज्य सरकारने प्रत्येक सर्कलमध्ये एकाच एजन्सीचे आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे समजले. त्यामुळे एखाद्या सर्कलमध्ये दोन ते तीन एजन्सीला आधार नोंदणीची मशिन पुरविली असली, तरी तेथील एकाच एजन्सीचे मशिन सुरू ठेवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सरकारच्या या अजब कारभारामुळे नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे.

ज्येष्ठांना त्रास
आधार कार्डमधील चुका दुरुस्त करून घेतानाही अनेक नागरिकांना अडचणी येत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे आधार कार्डातील दुरुस्ती होत नसल्याच्या असंख्य तक्रारी "सकाळ'कडे प्राप्त झाल्या आहेत. ही समस्या दूर करण्यासंदर्भात अद्याप "यूआयडी'कडून कोणतीही उपयोजना करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

पुणे

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM

पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी...

03.03 AM