१०९ बळी जबाबदार कोण?

१०९ बळी जबाबदार कोण?

पुणे - हडपसर ते मंतरवाडी चौक, मंतरवाडी ते कात्रज बाह्यवळण, सोलापूर रस्त्यावरील बीआरटी तसेच रामटेकडी ते काळेपडळदरम्यान लोहमार्गावर अपघातांमध्ये गेल्या दोन वर्षांत १०९ जणांचा बळी गेला आहे. चौकांचे रखडलेले रुंदीकरण, रस्त्यांची चाळण, साइड पट्ट्यांचा अभाव, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना सुविधांचा अभाव, अवजड वाहतूक आणि बीआरटी मार्गावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघात होत आहेत.  

हडपसर-मंतरवाडी पालखी रस्ता  
सासवडकडे जाणाऱ्या मार्गावर अपघातांत गेल्या दोन वर्षांत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. मंतरवाडी चौक अरुंद असून, या मार्गांवर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गांवर रस्त्याच्या साइड पट्ट्यांचे काम आणि रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. जागोजागी रस्त्यावरील खडी निघाली आहे. फुरसुंगी रेल्वे उड्डाण पुलावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होत आहेत.

उपाययोजना  
 रस्त्याचे रुंदीकरण आणि खड्डे बुजविण्याची गरज 
 मंतरवाडी चौकाच्या रुंदीकरणाची गरज
 फुरसुंगी पूल अरुंद असल्यामुळे त्यालगतच्या प्रस्तावित पुलाचे काम तातडीने हाती घेणे   रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटविणे 
 अवजड वाहतुकीला बंदी   फुरसुंगी मालधक्का स्थलांतरित करणे 
 हडपसर ते मंतरवाडी फाटा यादरम्यान दुभाजकाची गरज

बीआरटी मार्गांवर अपघातांत वाढ  
फातिमानगर चौक ते हडपसर बीआरटी मार्गावर अपघातांत गेल्या दोन वर्षांत २३ जणांचा बळी गेला आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होते. त्यामुळे रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसून अपघात होतात. बीआरटी मार्गांवर सूचना फलक नाहीत. दुभाजकांवर रिफ्लेक्‍टर नाहीत. दुभाजकांवर चढून नागरिक रस्ता ओलांडतात. या मार्गावर अवजड वाहतूक सुरू असते. गाडीतळ पीएमपी डेपोच्या बाजूने जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. तेथील डेपोची जागा अपुरी पडते. रस्त्याच्या कडेला बसेस पार्क केल्या जातात. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत. फातिमानगर चौकात उड्डाण पूल नसल्यामुळे अपघात होत आहेत.  

उपाययोजना
 प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करणे
 रस्ता दुभाजकांची उंची वाढविण्याची गरज 
 जागोजागी सूचना फलक व रिफ्लेक्‍टर बसविणे
 बीआरटीत घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाईची गरज
 फातिमानगर चौक ते गाडीतळदरम्यान पूल तयार करणे
 अवजड वाहतुकीवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज
 फातिमानगर, रामटेकडी, वैदूवाडी, काळुबाई चौकात उड्डाण पुलाची गरज

लोहमार्गावर  अपघातांत वाढ 
रामटेकडी ते काळेपडळदरम्यान लोहमार्ग ओलांडताना गेल्या दोन वर्षांत ३६ जणांचा बळी गेला आहे. लोहमार्गालगतच अतिक्रमण करून झोपड्या वसल्या आहेत. तेथील मुले लोहमार्गावर खेळत असतात. कानाला हेडफोन लावून बसल्यामुळे नुकताच एका विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला. झोपडपट्टीतील काही मद्यपी लोहमार्ग ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत. नागरिकदेखील रेल्वे फाटक बंद असताना लोहमार्ग धोकादायकरीत्या ओलांडतात. काळेपडळ, ससाणेनगर आणि रामटेकडी रेल्वे फाटकावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com