वकिलांच्या सनद पडताळणीस मुदतवाढ द्यावी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - वकिलांची सनद पडताळणी मोहिमेस मुदत वाढ द्यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने केली आहे. सनद पडताळणीच्या प्रक्रियेतील अडचणींचा विचार केला पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे. 

पुणे - वकिलांची सनद पडताळणी मोहिमेस मुदत वाढ द्यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने केली आहे. सनद पडताळणीच्या प्रक्रियेतील अडचणींचा विचार केला पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्र गोवा व बार कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील वकिलांच्या सनद पडताळणी अडीच वर्षापुर्वी सुरू केली होती. याची मुदत नुकतीच संपली आहे. या सनद पडताळणीत पुण्यातील अनेक वकिल तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिले आहेत. अर्ज दाखल केलेल्यांपैकी दीड हजार वकिलांच्या अर्जात चुका आढळून आल्या आहेत. त्यांची यादी मुदत संपण्याच्या एक दिवस आधी जाहीर केल्याने कागदपत्रांची आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी काही वकिलांना पुरेसा वेळ मिळाला नाही. यामुळे वकिलांची सनद धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमितपणे वकिली व्यवसाय करणाऱ्या वकिलांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका पुणे बार असोसिएशनने घेतली आहे. सनद पडताळणीस मुदत वाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र दौंडकर यांनी केली आहे. 

पडताळणीसंदर्भातील नियमांत वेळोवेळी बदल केले गेल्याने त्याविषयी वकिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, पडताळणीसाठी दिलेल्या शुल्काची पावतीही वकिलांना मिळाली नाही, सादर केलेली कागदपत्रे कौन्सिलच्या कार्यालयातून गहाळ झाली, राज्यातील 30 ते 35 हजार वकिलांची पडताळणी झाली नाही, पडताळणीसंदर्भात कौन्सिलकडून जागृती केली गेली नाही असा दावा वकिल करीत असून, मुदत वाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पुणे

पुणे - मानीव अभिहस्तांतर (डीम्ड कन्व्हेयन्स) करण्यासाठी आता सोसायट्यांना भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. त्याऐवजी...

04.03 AM

पुणे - शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक कोथरूडमध्ये एकाच जागेवर उभारण्यासाठीच्या पर्यायांचा तातडीने अभ्यास करून अहवाल सादर...

04.00 AM

पिंपरी - हिंमत असेल तर खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेनेतर्फे लढवून दाखवावी. भारतीय जनता पक्षाचे आणि...

04.00 AM