पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेचार किलो सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - केंद्रीय सीमा शुल्क विभागाने आखाती देशातून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिलेसह चार प्रवाशांकडून साडेचार किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत एक कोटी 38 लाख रुपये इतकी आहे. या प्रवाशांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्‍त महेश पाटील यांनी दिली. 

रफतजहॉं शौकत अली, आसिफ खान, महम्मद अशपाक महम्मद कासिम आणि हुसेन सय्यद अहमद (चौघेही रा. मुंबई) अशी त्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघेजण अबुधाबीवरून जेट एअरवेजने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर ते घाई-गडबडीत बाहेर जात होते. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या प्रवाशांचा संशय आला. त्यांनी त्या प्रवाशांना हटकले. त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता, त्यात रेडिअम धातूचे आवरण असलेल्या सोन्याच्या तारा आणि तीन सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यांचे वजन चार किलो सहाशे ग्रॅम इतके आहे. अबुधाबी येथून तस्करी करून हे सोने पुण्यात आणल्याची कबुली त्या प्रवाशांनी दिली. त्यांनी हे सोने ट्रॉली बॅगेत, तसेच हेअर ड्रायर आणि मिनी ट्रान्सफॉर्मरमध्ये लपविले होते. सीमा शुल्क विभागाचे अधिकारी भरत नवाळे, मनीष दुडपुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स