'संयुक्त प्रयत्नातून दहशतवादाचा बीमोड'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पुणे - ""दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. या दोन्ही राष्ट्रांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा संयुक्त लष्करी सराव उपयुक्त ठरेल,'' असा विश्‍वास श्रीलंका लष्कराचे ब्रिगेडियर अजित पल्लवेला यांनी शुक्रवारी व्यक्त केले. देशांतर्गत बंडखोरी आणि दहशतवाद विरोधातील लढाई यात दोन्ही देशांतील लष्करात समन्वय असणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारत आणि श्रीलंका लष्करामध्ये पाचव्या "मैत्री शक्ती 2017' या संयुक्त सरावाचे उद्‌घाटन पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारतीय लष्करातील ब्रिगेडियर आलोक चंद्रा उपस्थित होते. 

पल्लवेला म्हणाले, ""श्रीलंकेच्या लष्कराने लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेविरोधात लढाई केली आहे. या मोहिमेत श्रीलंकेला भारताने मदतीचा हात दिला होता. या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या या संयुक्त लष्करी सरावाचा दोन्ही देशांना फायदा होईल.'' 

ब्रिगेडियर चंद्रा म्हणाले, ""सर्व समाज आणि जगालाही दहशतवादी हल्ल्यांचा फटका बसत आहे. त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई लढताना परस्परांमधील युद्धकौशल्य आत्मसात करण्यासाठी हा सराव महत्त्वाचा ठरेल. यातून दोन्ही लष्करात सांस्कृतिक बंध निर्माण होतील.'' 

कुकरी, कॅंडीयन नृत्य 
करडी शिस्त, सहास, लयबद्ध पारंपरिक नृत्यप्रकार, जवानांचे साहसी क्रीडा प्रकार आणि रिमझिम पडणाऱ्या पावसातही कायम असणारा निर्धार या वातावरणात शुक्रवारी भारत आणि श्रीलंका संयुक्त युद्धसरावाला सुरवात झाली. या निमित्ताने दोन्ही देशांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. गोरखा जवानांचे कुकरीनृत्य, तर श्रीलंकेच्या लष्कराने तेथील पारंपरिक कॅंडीयन नृत्य केले. महार बटालियनच्या जवानांनी साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले.