आकुर्डीत कंटेनरने महाविद्यालयीन तरुणाला चिरडले

रविंद्र जगधने
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

आज (गुरुवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराची घटना

पिंपरी : आकुडी येथील म्हाळसाकांत चौकाजवळ कंटेनरने दुचाकीवरून (एमएच १४ एजे ८७४८) जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला चिरडले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

आशिष दीपक बावसकर (रा. शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. आशिष सिम्बॉयसिस महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात झाला तेव्हा आशिष हा दुचाकीच्या मागे बसला होता, तर त्याचा मित्र दुचाकी चालवत होता, असे सूत्रांनी सांगितले.

शिवकुमार हरेराम डांगी असे कंटेनरच्या चालकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

    टॅग्स