अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सोमवारी संप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पुणे - राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यव्यापी संप पुकारल्याची माहिती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

शमीम म्हणाल्या, ‘‘अंगणवाडी सेविकांना सध्या दरमहा पाच हजार रुपये तर मदतनिसांना अडीच हजार रुपये असे तुटपुंजे वेतन मिळते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी देण्यात यावी, तसेच मदतनिसांना सेविकांच्या ७५ टक्के वेतन देण्यात यावे, अशी मागणी वारंवार सरकारकडे करण्यात आली होती. ३० मार्च रोजी विधानभवनात याबाबत मिळालेल्या आश्‍वासनामुळे कृती समितीने एक एप्रिलपासून पुकारलेला बेमुदत संप स्थगित केला होता. या बैठकीस ५ महिने उलटून गेले तरीदेखील शासनाकडून निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर २० जुलै रोजी बीड येथे तर २५ जुलै रोजी मुंबई येथील मोर्चासमोर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आठवडाभरात अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे.’’

Web Title: pune news anganwadi employee strike