'देशसेवेसाठी आपला एक मुलगा तरी सैन्यात भरती झाला पाहिजे'

संदीप जगदाळे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

दिपोत्सवा दरम्यान प्रत्येक नागरिकांने एक पणती शहिद जवानासाठी पेटवली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' शहिद 'सौरभ फराटे अमर रहे' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने भव्य रांगोळ्या साकारण्यात आल्या. अमनोरा मधील शिवानी हरसोरा, निकिता जितकर, सुमीत लोकरे आदी तरुणांनी पणत्या सजवून कार्यक्रमाची शोभा वाढविली .

हडपसर : सैन्यातील माझा मुलगा सौरभ हा दहशतावदी हल्ल्यात शहीद झाला. दुसरा मुलगा देखील सैन्यदलाच्या सेवेत आहे. माझ्या पेक्षा देश मोठा आहे. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून माझ्या नातवाला देखील मी सैन्यदलात भरती करणार आहे. आज बहुतांश पालक माझा मुलगा केवळ डॅाक्टर, इंजीनीआर झाला पाहिजे, अशी स्वप्ने बाळगतात. मात्र देशसेवेसाठी आपला एका तरी मुलागा सैन्यदलात भरती झाला पाहिजे, हे स्वप्न ठेवणा-या पालकांची संख्या वाढायला हवी, असे कककळीचे अवाहन शहिद जवान सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल फराटे यांनी केले. 

अमनोरा येथील सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फोरमच्या वतीने शहीद जवाणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'एक दिवा जवानांसाठी' उपक्रम घेवून दिपोत्सवाचे आयोजन केले होते, याप्रसंगी फराटे बोलत होत्या. यावेळी फोरम व अमनोरा नागिराकांतर्फे सौरभ फराटे यांच्या आई मंगल फराटे व वडील नंदकुमार फराटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून दिपोत्सवास सुरवात केली. तसेच श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या हस्ते फराटे कुटूंबीयांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी फोरमचे सदस्य शैलेश तुपे, डॉ अमोल पाटील, राजेन्द्र जितकर, डॉ अविनाश तोडकर, हेमंत अभंग, दिलीप पुंड, प्रदीप जोशी, दीपक भापकर, संतोष शेडगे, निरंजना बाजपाई, सरला कासट, संगीता भुजबळ, सविता दरेकर, राधिका अशोक, स्विटी सिंघल, किरण नागवडे, वैभव परब, मयंक मित्तल, सुहास गुंडेवार, स्वप्नील शर्मा, शशिकांत साळुंखे, प्रवीण तुपे, शशिकांत लोकरे तसेच 350 हून अधिक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमनोरा मधील आर 2 व आर 3 सेक्टर मध्ये हा दिपोत्सव साजरा करण्यात आला. 

फोरमचे संयोजक हेमंत अभंग म्हणाले, देशाच्या सीमांच्या सुरक्षेत तैनात असणारे सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत व दिवाळी सण आनंदाने साजरा करु शकतो. देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फोरम तर्फे एक दिवा जवानांसाठी उपक्रम घेण्यात आला. 

दिपोत्सवा दरम्यान प्रत्येक नागरिकांने एक पणती शहिद जवानासाठी पेटवली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' शहिद 'सौरभ फराटे अमर रहे' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने भव्य रांगोळ्या साकारण्यात आल्या. अमनोरा मधील शिवानी हरसोरा, निकिता जितकर, सुमीत लोकरे आदी तरुणांनी पणत्या सजवून कार्यक्रमाची शोभा वाढविली .

प्रस्तावित शहीद जवान सौरभ फराटे स्मारकासाठी अमनोरा मधील नागरिकांच्या वतीने 25,000 रूपयांचा सहाय्यता निधी उपलब्ध करून दिला तसेच तसेच स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सिटीझन्स सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फोरम तर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे अभंग यांनी नमूद केले.