जनतेनेच आपल्याला नेता म्हणायला हवे - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘नेत्याने किंवा कार्यकर्त्याने आपल्याला नेता म्हणण्यापेक्षा जनतेने नेता म्हणायला हवे, असेच नेते निवडणुका सहज जिंकतात,’’ असे मत आमदार बच्चू कडू यांनी येथे व्यक्‍त केले. कुठलाही पक्ष नाही, जात-धर्म मानत नाही, अभिनेते प्रचाराला येत नाहीत, तरीही लोक मला मत देतात. त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात, असेही ते म्हणाले.

विश्वमाता फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ठिकठिकाणच्या शिक्षकांना ‘इनोव्हेटिव्ह टीचर्स अवॉर्ड’ कडू, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, हवामान विभागाचे रामचंद्र साबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक शिवाजी घाडगे, के. टी. गलांडे उपस्थित होते.
कडू म्हणाले, ‘‘जसा पैसा तसे शिक्षण, हे आजचे चित्र बनले आहे. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.’’ 

महाडेश्वर म्हणाले, ‘‘पदांची मस्ती, अहंकार डोक्‍यात जात कामा नये. मग तो नगरसेवक, महापौर, मंत्री असो किंवा मुख्यमंत्री. पदं येतात आणि जातातही. तारुण्य, सौंदर्य, संपत्ती आणि सत्ता यांचा मोह कधीही असू नये. हे कायमस्वरूपी आपल्यासोबत नसतात. याचे संस्कार शिक्षणप्रक्रियेतून व्हायला हवेत. शिक्षणातून चांगला माणूस घडू शकतो.’’ 

साबळे म्हणाले, ‘‘शिक्षकच उद्याचे राष्ट्र घडवत असतात, त्यामुळे शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे.’’