'मसाप'चे पहिले बालकुमार साहित्य संमेलन लोणावळ्याला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

२० सप्टेंबरला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे.

२० सप्टेंबरला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत. या संमेलनाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि मसापचे पदाधिकारी तसेच मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, संशोधन विभागप्रमुख व विश्वस्त गजानन केळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.