शिर्सुफळ येथील पशुवैद्यकीय इमारतीची दुरावस्था

शिर्सुफळची पशुवैद्यकीय इमारतीची दुरावस्था
शिर्सुफळची पशुवैद्यकीय इमारतीची दुरावस्था

शिर्सुफळ (बारामती): बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील पशुवैद्यकीय आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. स्लँबला तडे गेले आहेत. चहुबाजूंनी पाणी पाझरत आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याचा धोका आहे. यामुळे पशुपालनात अग्रेसर असलेल्या या भागाला अत्याधुनिक पशुवैद्यकिय सेवेपासून वंचित राहवे लागत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

बारामती तालुक्याच्या अनेक भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. यामध्ये शिर्सुफळ पशुवैद्यकिय केंद्रामध्ये शिर्सुफळसह साबळेवाडी, गाडीखेल, गोजुबावी, सावंतवाडी या गावांचा समावेश होतो. पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे या भागात गाई व म्हशींची संख्या मोठी आहे. शासनाच्या सर्व्हेनुसार शिर्सुफळ पशुवैद्यकिय क्षेत्रांअंर्तगत येणाऱ्या गावांमध्ये 2476 संकरित गाई, 1422 देशी गाई, 1435 देशी बैल, 26 रेडे, 525 म्हशी, 3521 मेंढ्या, 3349 शेळ्या, 10985 घरगुती कुक्कुट पालन तर पोल्ट्रीफार्म मध्ये 2 लाख 14 हजार कोंबड्यांचा संभाळ केला जात आहे. यांच्यासाठी शिर्सुफळ श्रेणी एकचा पशुवैद्यकिय दवाखाना आहे.

या भागात सुसज्ज पशुवैद्यकिय दवाखान्याची आवश्यकता असताना सध्या असलेल्या दवाखान्याची इमारत सहा खोल्याची आहे. सदर खोल्यांचे स्लँबला जागोजागी तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी स्लँबच्या लोखंडी सळई उघड्या झालेल्या आहेत. पावसाळ्यात सर्वत्र पाणी गळते. यामुळे याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्माचारी यांनाही जनावरांचे लसीकरण, वंधत्व निवारण, औषधोपचार, दूध उत्पादनात वाढ, कृत्रिम रेतन, उत्तम जनावरांची पैदास यांसह शासनाच्या असलेल्या इतर योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. यासाठी या भागात नविन इमारत उभारण्याची मागणी होत आहे.

आरोग्य सेवा चांगली पण सुविधांचा अभाव...
याबाबत बोलताना बारामती तालुका दुध संघाचे संचालक अँड. नितीन आटोळे म्हणाले, शिर्सुफळ येथील पशुवैद्यकिय दवाखान्यांमध्ये आरोग्य सेवा चांगली आहे. पण चांगली इमारतीसह इतर सुविधा नसल्याने पशुपालकांची गैरसोय होत आहे. याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत सदस्य व हनुमान दुध संस्थेच अध्यक्ष विश्वास आटोळे म्हणाले, शिर्सुफळसह परिसरात मोठ्या प्रमाणावर पशुपालक आहेत. याभागात दुधाचे उत्पादन अधिक घेतले जाते मात्र सुसज्ज पशुवैद्यकिय केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होते.

नविन इमारतीसाठी पाठपुरावा करणारः रोहित पवार
शिर्सुफळ येथील पशुवैद्यकिय केंद्राच्या इमारतीची पाहणी केली आहे. या भागात नविन सुसज्ज पशुवैद्यकिय दवाखान्याची आवश्यकता आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नविन इमारत मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com