बारामतीचे माजी नगरसेवक अॅड. गव्हाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

अॅड. विजय गव्हाळे हे दलित चळवळीचे नेते आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

बारामती : येथील माजी नगरसेवक अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. इंदापूर रोडवरील मोती बाग पुलाजवळ काल रात्री अॅड. गव्हाळेंवर हल्ला करण्यात आला.

हा हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकले नाही. चार ते पाच अज्ञात हल्लेखोर असावेत असा अंदाज आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

अॅड. विजय गव्हाळे यांच्यावर चार वार करण्यात आले असून, त्यांच्यावर बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अॅड. विजय गव्हाळे हे दलित चळवळीचे नेते आहेत. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर आणि पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Web Title: Pune news baramati corporator vijay gavhale attacked