ट्रॅक्टर - दुचाकीच्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू

अपघातग्रस्त गाडी
अपघातग्रस्त गाडी

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावाच्या हद्दीमध्ये चिखली फाट्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बेलवाडी येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.  

गणेश ऊर्फ अक्षय महादेव जामदार (वय १८) व सोनू केशव जामदार (वय १९) दोघेही राहणार बेलवाडी (ता. इंदापूर) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. रविवार (ता. १९) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोघेजण लासुर्णे गावातून एच ४२ एके ९०९९ या दुचाकीवरून बेलवाडी गावामध्ये घराकडे निघाले होते. चिखली फाट्याच्या जवळ बारामती - इंदापूर मुख्य रस्त्यावर दुचाकीला ट्रॅक्टर ट्रॉलीने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, साहय्यक फौजदार शिवाजी होले, सुरेंद्र वाघ, दिलीप शिंदे राजू जगदाळे, विजय शेंडकर, प्रकाश माने यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदत केली.रात्री उशीरापंर्यत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भरधाव वेगाने घेतले दोन बळी
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली भरधाव वेगाने जोरदार वाहने चालवत आहेत. दरवर्षी या परिसरात अपघात होत असून, नागरिकांचा जीव जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com