मोरगाव-बारामती रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत 1 ठार, 1 गंभीर

मिलिंद संगई
रविवार, 9 जुलै 2017

सतीश यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर मोटारसायकलवर मागे बसलेले भीमराव किसन मोरे (रा. अंजनगाव, ता. बारामती) हे या अपघातात गंभीर जखमी झाले.

बारामती : तालुक्यातील मेडद गावाच्या हद्दीत मोरगाव - बारामती रस्त्यावर दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने त्यावरील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

काल (शनिवार) संध्याकाळी मोरगावच्या बाजूकडून बारामतीच्या दिशेने निघालेल्या टाटा टेम्पो (MH 42 M 8173) या वाहनाने दुचाकीवर निघालेल्या (MH 42 N 175) सतीश ज्ञानदेव भोसले (रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती) यांना जोरदार धडक दिली. यात सतीश यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर मोटारसायकलवर मागे बसलेले भीमराव किसन मोरे (रा. अंजनगाव, ता. बारामती) हे या अपघातात गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर टेम्पोचा चालक गाडी सोडून पळून गेला. या बाबत राकेश मधुकर मोरे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.