'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड

rohit pawar
rohit pawar

शिर्सुफळ (बारामती, पुणे): इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या साखर उद्योगातील अग्रगण्य संस्थेच्या उपाध्यक्षपदी बारामती अॅग्रो चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

'इस्मा' ही संस्था साखर उद्योगातील सर्वात जुनी संस्था असून, या संस्थेची स्थापना १९३२ साली झाली. भारतातील साखर उद्योग, साखरेची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सहभाग, आयात-निर्यात, सहवीज प्रकल्प, उपपदार्थ निर्मिती, ऊसशेती संशोधनासंबंधी कार्य करणारी संस्था आहे. तसेच साखरेच्या बाजारपेठेत स्थिरता ठेवण्यासाठी शासनाला धोरणनिर्मितीत मदत करणे. ऊसउत्पादनातील चढउतारावेळी बाजारभाव स्थिर ठेवून साखर उद्योजक, उसउत्पादक शेतकरी, कामगार आदी घटकांचा समतोल राखणे यासाठी सरकारी धोरणनिर्मिती होते. त्यामध्ये 'इस्मा' व एनएफसीएफएस (नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप शुगर) या संस्था शासनाला सहकार्य करतात.

बारामती ऍग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार सध्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) चे उपाध्यक्ष तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ते महाराष्ट्र राज्य व पश्चिम भारतातील साखर उद्योगांचे प्रतिनिधित्व करत आहेत. 'इस्मा' मधील निवडीतून ते आता संपूर्ण भारत देशातील साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व 'इस्माच्या' माध्यमातून करतील. साखर उद्योगातील सहभाग आणि साखर उद्योगाशी निगडीत संस्थेतील त्यांची कार्यशैली लक्षात घेऊन 'इस्मा' या संस्थेने रोहित पवारांची निवड केली. 'इस्मा' या संस्थेच्या नियमानुसार पुढील वर्षी रोहित पवारांची अध्यक्षपदी निवड होणार आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com