पारवडी (ता. बारामती) येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन करताना प्राचार्य सखाराम गावडे यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
पारवडी (ता. बारामती) येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन करताना प्राचार्य सखाराम गावडे यावेळी उपस्थित इतर मान्यवर.

'आजच्या पिढीने शिवचरित्र वाचून सक्षम व सुसंस्कृत होणे गरजेचे'

शिर्सुफळ (पुणे): जिजाऊची शिवबाला चांगली शिकवण होती, म्हणून राजेशिवाजी घडले.आजची पिढी मात्र सोशल मिडीयाच्या आहारी जात आहे.याचे दुष्परिणाम आगामी काळामध्ये दिसणार आहेत. यामुळे आजच्या पिढीने शिवचरित्र वाचून सक्षम व सुसंस्कृत होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सखाराम गावडे यांनी केले.

पारवडी (ता. बारामती) येथील कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य गावडे बोलत होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली शिवाजी महाराजांचे बालपण ते राज्याभिषेकाचा सोहळा असा सर्व इतिहास या मुलांनी सर्वासमोर उभा केला. यामध्ये सर्वधर्म समभाव, परस्त्री माते समान मानणे, कठोर शासन व्यवस्था म्हणजेच न्यायव्यवस्था, लोकशाही व्यवस्था , बुदधीचातुर्य अशा गुणाची महती सांगितली. तर विद्यालयातील शिक्षक संभाजी मेरगळ यांनी मार्गदर्शन करताना आज समाजामध्ये जयंतीच्या कार्यक्रमास वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे व सामाजिक एकोपा साधला गेला पाहिजे अशी भावना व्यक्त केली .या कार्यक्रमास पर्यवेक्षक दिलीप पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक सोमनाथ गौडगाय यांनी तर आभार राजेंद्र पोमणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com