डांबर मिक्स करण्याच्या मशिनचा ब्रेक फेल; दोघे जखमी

महादेव पवार
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

वारजे (पुणे) : डांबर मिक्स करण्याचे मशीन रोडवरून जात असताना त्या मशीनचे ब्रेक फेल झाल्यामुळे ते दुचाकीवरून जाणाऱया दोघांच्या अंगावर आल्याची घटना आज (शुक्रवार) घडली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिंदेपुल शिवणे या ठिकाणी आज दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. डांबर मिक्स करण्याचे मशीन रोडवरून जात असताना त्या मशीनचे ब्रेक फेल  झाले. यावेळी दुचाकीवरून श्री. मोहोळ व त्यांच्या मातोश्री जात होते. दुर्देवाने ते मशिन त्यांच्या अंगावर आले व अपघात झाला.

यावेळी नगरसेवक सचिन दोडके, स्थानिक कार्यकर्ते प्रविणबापू दांगट, अतुल दांगट, सुशांत देशमुख, हरिष मुनोत, राकेश पोखरणा, विष्णुपंत देशमुख, सागर जावळकर, रामलाल जैन यांनी तातडीने दोघांना मदत केली. अपघातग्रस्त महिलेची दुखापत जास्त असल्यामुळे सचिन दोडके, कुनाल दांगट यांनी स्कूल व्हॅनमधून महिलेला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, यावेळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी नागरिकांनी सर्वांनी क्रेन मागवून ते मशीन रस्तातून बाजूला घेवून रस्ता मोकळा केला.