भिडे वाडयाचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे, अन्यथा...

भिडे वाडयाचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे, अन्यथा...
भिडे वाडयाचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे, अन्यथा...

पुणे : "सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ जिथे केला, त्याच भिडे वाडयाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे भिडे वाडयाचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे. अन्यथा भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल" असा इशारा भिडे वाडा स्मारक समितीने आज (गुरुवार) दिला.

भिडे वाडा स्मारक समितीतर्फे "भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे" या मागणीसाठी आज भिडे वाडयामोर आंदोलन आणि मानवी साखली करण्यात आली. याबरोबरच राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीला साकडे घालण्यात आले. आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.माजी आमदार कमल ढोले पाटील, मंजिरी धाडगे, सुनीता भगत, सुनीता भगत, सुप्रिया ताम्हाणे, शारदा लडकत, संगीता येवलेकर, महाबळश्वरचे नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, दीपक जगताप, मधुकर राऊत, सतीश गायकवाड, प्रितेश गवली, दशरथ कुळधरण आदी उपस्थित होते. समितीतर्फे आपल्या मागणीचे निवेदन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आले.

ढोले पाटील म्हणाल्या, "आतापर्यंत भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करणयाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. मात्र, यापुढे या स्मारकाबाबत गांभीर्याने निर्णय न घेतल्यास समितीतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. स्मारकासाठी येथील दुकानदार व रहिवासी यांचा पाठिंबा आहे. त्यांच्याकडून सहकार्य केले जात आहे. त्यामुळे सरकारने आता अधिक वेळ न घेता, त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे."

उज्ज्वला पिंगले म्हणाल्या, "राज्याच्या विविध भागासह अन्य राज्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहेत. मात्र, जिथे त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, त्या भिडे वाडयाचे राष्ट्रीय स्मारक करन्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे."

घाडगे म्हणाल्या, "राष्ट्रीय स्मारक झाले नाहीत, तर महिला शांत राहणार नाहीत. त्याची महापालिका व राज्य सरकारने घ्यावी."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com