...तरीही सरकारला पाझर फुटत नाहीः वळसे पाटील

सुदाम बिडकर
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पारगाव (पुणे) :  राज्यात करोडो रुपयांची गुंतवणुक केलेले शेतकर्यांच्या मालकीच्या सहकारी संस्थाचे विज प्रकल्प तयार असूनही शासन विज खरेदी करत नाही. एक हजार मेगावॉट वीज तयार होत असून चार हजार कोटी रुपयांची वीज पडून आहे, तरीही सरकारला पाझर फुटत नाही, अशी माहीती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पारगाव (पुणे) :  राज्यात करोडो रुपयांची गुंतवणुक केलेले शेतकर्यांच्या मालकीच्या सहकारी संस्थाचे विज प्रकल्प तयार असूनही शासन विज खरेदी करत नाही. एक हजार मेगावॉट वीज तयार होत असून चार हजार कोटी रुपयांची वीज पडून आहे, तरीही सरकारला पाझर फुटत नाही, अशी माहीती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

दत्तात्रयनगर (पारगाव, ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 21व्या अधिमंडाळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थावरुन सभासदांना मार्गदर्शन करताना श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समीतीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, निलेश थोरात, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, अरुणा थोरात, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सर्व संचालक, सभासद तसेच तालुक्यातील सर्व सहकारी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष श्री. बेंडे म्हणाले, कारखान्याने सन 2016-17 हंगामात चार लाख 56 हजार 620 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. सरासरी 11.12 टक्के साखर उतार्याने पाच लाख सात हजार 975 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विजनिर्मिती प्रकल्पातून 16 कोटी 19 लाख 11 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळविले आहे.

श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले, 'कारखाना सुरु केला त्यावेळी या परिसरात ऊस नव्हता शेतकर्यांनी विश्वास टाकला त्या विश्वासावर संचालक मंडळ, कर्मचारी, आधिकारी व सभासदांच्या प्रयत्नामुळे कारखान्याची यशस्वी घौडदौड सुर आहे. सध्या शेतकर्यांचे सरासरी प्रती हेक्टरी 66 टन ऊस उत्पादन 130 टनावर नेण्यासाठी भीमाशंकरने वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या मदतीने ऊस उत्पादकता वाढ योजणा आणली आहे यासाठी भीमाशंकर 50 कोटी रुपये खर्च करणार आहे यामध्ये शेतकर्यांना प्रशिक्षण, तज्ञांचे मार्गदर्शन, ऊस बेणे प्रक्रीयेसाठी उधारीवर औषध पुरवठा, माती व पाणी परिक्षण, मळीवर प्रक्रीया करुन कंपोष्ट निर्मिती, जिवाणु खते व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा, ठिबकसाठी बिनव्याजी वसुलपात्र अनुदान, खोडवा व्यवस्थापणासाठी वाढीव अनुदान देणार आहे. कारखान्यामध्ये 10 कोटी रुपये खर्च करुन आधुनकीकरण केले आहे त्यामुळे साखर उतारा वाढुन यापुढे प्रत्येक हंगामात सात कोटी रुपयांचे जास्त उत्पन्न मिळणार आहे. यावर्षी भीमाशंकरला 11 कोटी 64 लाख रुपयांचा नफा झाला आहे. 84 कोटीचे नक्त मुल्य झाले असल्याने कारखान्याची पत सुधारली असुन त्याव्दारे 843 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. कारखान्याच्या 198 कोटीची कर्ज व ठेवी आहेत. विविध बॅकांत 112 कोटीच्या ठेवी आहेत कारखान्याने वीजप्रकल्पासाठी एकुण 91 कोटी खर्च केले असुन त्या माध्यमातुन आत्तापर्यंत 123 कोटी रुपयांची वीज विकली आहे. कारखान्याने या परिसरातील नागरिकांसाठी बहुउद्देशिय सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ऊसखरेदी कराच्या माफीतुन भीमाशंकरला 76 कोटी माफ होणार होते परंतु शासनाच्या जी.एस.टी.च्या धोरणामुळे 37 कोटीचा तोटा होणार आहे. कामगारांचा एकदाही पगार थकवलेला नसुन दिवाळीला 20 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2016-17 गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी. 2293 रुपये असतानाही 2650 रुपये अदा केले आता शिक्षणसंस्था व भाग विकास निधीचे 100 रुपये कपात करता 200 रुपये प्रती मेट्रीक टन शेतकर्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जातील. 2015-16 मध्ये गाळप केलेले ऊसास एफ.आर.पी. प्रमाणे 2250 रुपये दिले आहेत. शासनाची परवानगी मिळो अथवा न मिळो दिवाळीपुर्वी शिक्षणसंस्था व भाग विकास निधीचे 100 रुपये कपात करता 200 रुपये प्रती मेट्रीक टन शेतकर्यांना दिले जातील असे त्यांनी सांगीतले. सुत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी यांनी केले. आभार संचालक ज्ञानेश्वर गावडे यांनी मानले.

भीमाशंकरचा कारभार पारदर्शक असून कोणालाही शंका असल्यास पुढील आठ दिवसात कारखान्याच्या कार्यालयात यावे त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली जातील, अशी ग्वाही श्री. वळसे पाटील यांनी दिली.

Web Title: pune news bhimashankar sugar factory and dilip walse patil