सामान्य नागरिकांवर भाजपचा भर - बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यावर भारतीय जनता पक्षाचा भर असणार आहे. आगामी काळात पुणेकरांना त्याचा प्रत्यय येईल,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यावर भारतीय जनता पक्षाचा भर असणार आहे. आगामी काळात पुणेकरांना त्याचा प्रत्यय येईल,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पटवर्धनबाग येथे आयोजित ‘शेतकरी आठवडे बाजार’चे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, राधाबाई ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बाजार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार मेधा कुलकर्णी, संयोजिका नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, राधाबाई ॲग्रो फार्मर्सचे संचालक शांताराम रायकर, कार्यकारी संचालक नीलेश रायकर, कर्वेनगर वारजे प्रभाग समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक दीपक पोटे, माधुरी सहस्रबुद्धे, जयंत भावे आदी
उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘शेतकरी आठवडे बाजार’ ही संकल्पना नागरिकांसाठी उपयुक्त आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीची परवानगी दिल्याने त्याचा लाभ शेतकरी आणि नागरिकांना होत आहे.’’ या बाजारात गावरान भाजीपाला, धान्य, कडधान्य, गूळ, काकवी, लाकडी घाण्यावरचे तेल उपलब्ध असून, दर शुक्रवारी हा बाजार भरणार असल्याचे मंजूश्री खर्डेकर यांनी सांगितले; तसेच नवसह्याद्री परिसर, सहवास सोसायटी, प्रभात रस्ता येथेही लवकरच शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात येणार असल्याचे खर्डेकर यांनी जाहीर केले.

Web Title: pune news The BJP emphasis on ordinary citizens