भाजपने शेतकऱयांना केले कर्ज बाजारी: शिवाजीराव नांदखिले

युनूस तांबोळी
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): ग्रामीण भागात गावागावात गावदलात गाय पाळली जात असताना गावाची प्रगती होत होती. 1976 मध्ये गाय कापायची नाय म्हणून कायदा झाला तेव्हापासून गावरान गायी संपुष्ठात आल्या. आता शेतकऱ्यांनी कर्जाऊ घेतलेल्या गायी शिल्लक राहिल्या असून, खोंड व खाटी गाया कशा संभाळायच्या हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप सरकारने मात्र 2014 मध्ये गोवंश हत्या करून शेतकऱ्यांना कर्ज बाजारी केल्याची टिका क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेट शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी केली.

पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शेतकरी कर्जमुक्ती जनजागरण यात्रा काढण्यात आली होती. येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पुणेचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग रायते, सुकाणू समितीचे अध्यक्ष श्रीकांत करे, नवनाथ बनसोडे, बाळासाहेब घाडगे, उपसरपंच रामदास ढोमे, निवृत्ती बोंबे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

नांदखिले म्हणाले की, निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचे काम सरकार करत आहे. कांद्याचे भाव वाढले पण व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याना बाजारभाव मिळाला. करातून मोठ्या प्रमाणात तिजोरी भरली जात आहे. उत्पादीत केलेला मालाची किमान आधारभूत किंमत व जाहिर किंमत यांच्यात तफावत असल्याने वार्षीक 50 हजार कोटीचे नुकसान शेतकऱ्याचे होत आहे. सरकारने ही तफावत भरून दिली तर कर्जमुक्ती होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेश ढोमे यांनी केले. माऊली ढोमे यांनी आभार मानले.

आत्महत्या करणार नसून लढणार...
भाजप सरकार हिंदू-मुस्लिम वाद पेटून देण्याचे काम करत आहे. त्यातून नवनवीन कायदे काढून अडवणूक केली जात आहे. उद्योग धंद्याना परवाना मिळण्यासाठी कोट्यावधी रूपयांची आर्थीक घडामोडी केल्या जातात. त्यातून पक्षासाठी निधी उपलब्ध करून घेतला जात आहे. राज्यात सध्या सत्ताधारी 60 तर विरोधी पक्षाला 40 असे आर्थीक व्यवहार होत आहे. यापुढे आम्ही आत्महत्या करणार नसून लढणार असल्याचे नांदखिले यांनी ठणकावून सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news BJP markets debt to farmers: Shivajirao Nandhkhile