पुणे: पंचवीस अंध जोडप्यांचा सामुदायिक विवाह

नितीन बिबवे
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

बिबवेवाडीतील नाजुश्री मंगल कार्यालयात सकाळपासूनच लगीनघाई सुरु होती. राज्यातून आलेल्या जोडपी व त्यांच्या नातेवाईकांची कार्यालय परीसरात तीन दिवसांपासून राहण्याची व्यवस्था केलेली होती.

पुणे : बिबवेवाडी परिसरात क्रिप्स फ़ाऊंडेशन व्दारा आयोजित दृष्टिहीन जोडप्यांचा सामुदायिक विवाह समारंभात शहरातील चार जोडप्यांसह राज्यातील इतर भागातून आलेल्या एकवीस जोडपी विवाह बंधनात अडकली.

बिबवेवाडीतील नाजुश्री मंगल कार्यालयात सकाळपासूनच लगीनघाई सुरु होती. राज्यातून आलेल्या जोडपी व त्यांच्या नातेवाईकांची कार्यालय परीसरात तीन दिवसांपासून राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्यातील काहींना आई वडील नसल्यामुले फ़ाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आई वडील बनून कन्यादान केले.

दृष्टिहीन असल्यामुळे लग्नासाठी खूपच अडचणी येत होत्या. परंतू क्रिप्स फ़ाऊंडेशनच्या माध्यमातून वैवाहिक आयुष्य मिळाले असून त्यामुले जीवनातील अंधकार कमी होऊन नवीन आयुष्याचा किरण नजरेस येत असल्याची भावना विवाह बंधनात अडकलेल्या नववधूंनी व्यक्त केली.

टॅग्स