पुणेः घरगुती वादातून मुलानेच केला आईचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

तळेगाव स्टेशन (पुणे) : सासू-सुनेमधील रोजच्या घरगुती वादातील कटकटीमुळे, मुलाने दारुच्या नशेत आपल्या 65 वर्षीय आईचा उशीने तोंड दाबून खून केल्याची खळबळजनक घटना मावळ तालुक्यातील इंदोरी येथे आज (गुरुवार) उघडकीस आली.

चिंताबाई यशवंत शिंदे (वय 65, रा. शिंदे वस्ती, इंदोरी, मावळ, पुणे) असे खून झालेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. बुधवारी (ता. 5) रात्री उशीरा झालेल्या या प्रकाराची माहिती आज सकाळी शेजारच्या नागरिकांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन, आरोपी मुलगा प्रमोद यशवंत शिंदे  (वय 27, इंदोरी, मावळ, पुणे) यास घरातूनच अटक केली. त्यानंतर मुलाने पोलिसांना दारुच्या नशेत, मारहाण करुन उशीने तोंड दाबून आईचा खून केल्याची कबूली दिली.

याप्रकरणी आरोपीच्या छोट्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहेत.