लाच मागणाऱ्या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - हडपसर पोलिस ठाण्यात अपघातग्रस्त दुचाकी परत घेण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

पोलिस हवालदार जगदीश बाबासाहेब कोंढाळकर (वय 45) आणि पोलिस नाईक नारायण ज्ञानदेव गोरे (वय 41) अशी गुन्हा दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

कोंढाळकर आणि गोरे हे दोघे हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांची दुचाकी ताब्यात घेतली होती. तक्रारदार व्यक्‍ती 29 जून रोजी त्यांची दुचाकी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. त्या वेळी ठाण्यातील मुद्देमाल विभागातील कोंढाळकर आणि गोरे यांनी तक्रारदारांकडे पाच हजार रुपये लाच मागितली. त्यावर तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्या दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शुक्रवारी (ता. 18) गुन्हा दाखल केला. दरम्यान, कोणत्याही सरकारी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.
 
Web Title: pune news bribe police