महिला पोलीस उपनिरीक्षक, कर्मचाऱ्याला 15 हजार रुपयांची लाच घेताना पकडले

Bribe
Bribe

पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यातील रिपोर्ट पॉझिटिव्ह पाठवण्यासाठी लाच घेतली जात होती. 

उपनिरीक्षक स्वाती मोरे आणि कर्मचारी हर्षल असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मोरे व हर्षल हे कोंढवा पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी विरूद्ध पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. दरम्यान या घटनेने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com