बौद्ध धर्म मानवता व विज्ञानवादीः अतुल गोतसुर्वे

बौद्ध धर्म मानवता व विज्ञानवादीः अतुल गोतसुर्वे
बौद्ध धर्म मानवता व विज्ञानवादीः अतुल गोतसुर्वे

जुनी सांगवी (पुणे): जगातील प्रत्येक कष्टकरी,शोषित माणसाला,विचारवंत विद्वानांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आदर आहे.बासाहेबांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला मात्र मानवता व विज्ञानवादी धर्म म्हणुन बौद्ध धर्माचा स्विकार केला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा जोपासणा-या धर्मांना बगल देत त्यांनी मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धर्माची निवड केली. मृत्युनंतर पुढे काय होते या प्रश्नाचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा वर्तमानात चांगल्या गोष्टींचे आचरण करा अशी शिकवण देणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय, असे भारत सरकार परराष्ट्र मंत्रालयाचे सांस्कृतिक विभागाचे संचालक श्री. अतुल गोतसुर्वे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, समाजात समतेने जगण्याचा मार्ग बुद्धांनी दिला. बुद्धांची पंचशील तत्व आचरणात आणुन अवलंबिल्यास दु:ख कमी होण्यास मदत होईल. डॉ. बाबासाहेब ही सुखकारक आयुष्य जगले असते. मात्र, त्यांनी बहुजन समाजासाठी त्याग केला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी आधी स्वयंप्रकाशीत व्हा. अंधश्रद्धा बुरसटलेल्या विचारांना दुर फेकुन समाजाच्या हिताच्या दृष्टीने एकसंघ रहा तरच बाबासाहेबांच्या विचारांना  आपण पुढे नेता येईल, असे गोतसुर्वे म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे खंजिरी वादन व प्रबोधनाने करण्यात आली. यावेळी ओबीसी परिषदेचे राज्य संघटक उल्हास राठोड, बबन कांबळे, आण्णासाहेब बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात भारत सरकार परराष्ट्र मंत्रालय सांस्कृतिक विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांचा समाज बांधवांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपिठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमरसिंग आदीयाल, राहुल काकडे, ऍड. संदीप नितनवरे, प्रा. रविंद्र इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपळे गुरव परिसरातील जुनी सांगवी, नवी सांगवी, औंध कँम्प मधील सेहचाळीस विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट, मंडळांच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन दीपक म्हस्के यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील बौद्ध समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com