वारजे नागरी वन उद्यानातील झाडे जाळली

वारजे नागरी वन उद्यानातील झाडे जाळली
वारजे नागरी वन उद्यानातील झाडे जाळली

वारजे माळवाडी (पुणे): केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या संकल्पनेतून वारजे येथे नागरी वन उद्यान उभारले आहे. येथे हजारो झाडे लावली आहेत. त्यातील सुमारे पाच-सहा एकराचा परिसर स्थानिक उपद्रवी नागरिकांनी जाळून टाकण्यात आला आहे.
 
या उद्यानातील पाच- सहा एकरातील सुमारे दोनशेहून अधिक झाडे जाळण्याचा प्रकार घडला आहे. वन विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने हे नागरी वन उद्यान उभारण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार वन विभागाने दडवून ठेवला होता. आमदार भीमराव तापकीर यांना फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष फिरून हा प्रकार पहिला आणि ही बाब त्यांनी सकाळच्या माध्यमातून उघडकीस आणली.

दरम्यान, तापकीर या ठिकाणी पाहणीसाठी गेले असता, तेथे दुपारी संध्याकाळी अनेकजण दारूच्या पार्ट्या करण्यासाठी येत असल्याचे पहावयास मिळाले. तर दररोज सकाळी रामनगर खनवस्तीच्या बाजूने काहीजण भिंतीवरून उड्या मारून शौचालयास वन उद्यानात येतात. व्यायामासाठी निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यास आलेल्या नागरिकांना हा प्रकार पहावयास मिळतो. हे नागरिक महिला फिरताना हे नागरिक येथून हलत देखील नाहीत.

वारजे गावठाणा जवळील सुमारे 70-80 एकरातील जागेवर तत्कालीन केंद्रीय वन व सध्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या संकल्पनेतून वारजे येथे नागरी वन उद्यान उभारले आहे. नागरिकांनी आपल्या आप्तजणाच्या नावाने येथे झाडे लावली आहेत. त्या झाडांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च त्या नागरीकांनी दिला आहे. त्याचबरोबर, अनेक नामवंत प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाने देखील झाडे लावली आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे आहेत. झाडे लावताना ती पाच सहा वर्षे वयाची आहेत.

आमदार तापकीर यांनी सांगितले की, "दैनंदिन पगारावरील एक खासगी मजूर आहे. त्यालाच 24 तास काम करावे लागते. दारूच्या पार्ट्या, शौचालय येणारे नागरिक हे वन अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे हे प्रकार घडत आहे. झाडांबाबत योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. एक खासगी व्यक्ती सुरक्षा रक्षक असला तेही वन विभागाच्या गणवेशातील कर्मचारी अधिकारी येथे वेळोवेळी आले तर अशा उपद्रवी लोकांवर परिणाम होईल. स्थानिक अधिकाऱयांना याची माहिती दिली. त्याचबरोबर, वनमंत्री सुधीर मुंगूनटीवार व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना हो बाब निदर्शनास आणून देणार आहे. शौचालयास येणाऱ्यांसाठी वन विभागाचे "गुड मॉर्निंग पथक"च्या माध्यमातून कारवाई करणार. येथे येणाऱ्या नागरिकांना तक्रार देण्यासाठी व्यवस्था नाही."

सहायक उपवनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले, "दोन हेक्टर(५ एकर) मधील सुमारे 200 झाडानं आगीची झळ बसली आहे. ही झाडे 8-9 फूट वाढली होती. सध्या थंडीचे दिवस पाण्याची गरज नाही. परंतु झळ बसलेल्या झाडांना आधार व ओलावा असण्यासाठी पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर त्यांना नवीन पालवी कोम फुटेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली होती. त्यावेळी गवत कापण्यात येत होते. त्यावेळी अज्ञातांनी काडी टाकून हे जाळले. त्यावेळी अग्निशमन दलच्या वतीने आग आटोक्यात आणली होती. या संदर्भात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दिली आहे, असे ही भावसार यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com